काही गोष्टी मनात असून करता येत नाहीत..
काही शब्द ओठावर असून बोलता येत नाहीत..
असं का होतं कळत नाही ..
आपल्या मनातलं कुणालाच ओळखता येत नाही ..
सगळ्या गोष्टी बोलून दाखवायलाच हव्यात का?
डोळ्यातले भाव वाचायला कुणी शिकवत नाही का?
बोललो तर गैरसमज व्हायलाच हवेत का?
अबोल्यानी दुरावा निर्माण होतो का?
मैत्रीत सर्व काही माफ असत असं म्हणतात..
तरी पण काही मर्यादेनंतर चुका ह्या चुकाच असतात..
क्षणिक भांडणं परत मैत्रीत बदलतात ना?
का मनात धरून ठेवून कायमचीच दरी बनतात ?
काही शब्द ओठावर असून बोलता येत नाहीत..
असं का होतं कळत नाही ..
आपल्या मनातलं कुणालाच ओळखता येत नाही ..
सगळ्या गोष्टी बोलून दाखवायलाच हव्यात का?
डोळ्यातले भाव वाचायला कुणी शिकवत नाही का?
बोललो तर गैरसमज व्हायलाच हवेत का?
अबोल्यानी दुरावा निर्माण होतो का?
मैत्रीत सर्व काही माफ असत असं म्हणतात..
तरी पण काही मर्यादेनंतर चुका ह्या चुकाच असतात..
क्षणिक भांडणं परत मैत्रीत बदलतात ना?
का मनात धरून ठेवून कायमचीच दरी बनतात ?
कसं समजवावं त्या जिवाभावाच्या मैत्रीला..??
काही गोष्टी न सांगताच समजून घे ना...
- तन्मया राव
Very nice poem
ReplyDeleteamazing !!!
ReplyDeletegood work gal